• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात ‘इनकमींग’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 13, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
प्रचार सोडून उमेदवार करण पाटील पोहचले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात

डॉ. अस्मिता पाटील यांच्यासह पाचोरा-भडगावातील पदाधिकार्‍यांचा प्रवेश

मुंबई ( प्रतिनिधी ) : जळगाव जिल्ह्यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमींग सुरूच असून आज ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिता पाटील व बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लकी टेलर तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध पदाधिकार्‍यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर पक्षात प्रवेश घेतला असून यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला बळकटी प्राप्त झाली आहे.

जळगाव जिल्हा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात अलीकडच्या काळात अनेक मान्यवर दाखल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच जळगावचे खासदार उन्मेष पाटील तसेच पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आपल्या समर्थकांसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. यानंतर लागलीच करण पवार यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी देखील मिळाली होती. यानंतर, लवकरच शिवसेना-उबाठा पक्षात मान्यवरांचे आगमन होणार असल्याचे संकेत मिळाले होते. या अनुषंगाने आज मुंबईत मातोश्रीवर पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

आजच्या सोहळ्यात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिता पाटील, भारत राष्ट्र समिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लकी टेलर, जळगावच्या माजी नगरसेविका सरिता नेरकर, वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव येथील नेते मोरसिंग राठोड यांच्यासह इतरांनी पक्षात प्रवेश घेतला.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/04/VID20240413182414.mp4

आजच्या प्रवेश सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात पाचोरा-भडगाव मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी पक्षात दाखल झाले. यात शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिताताई पाटील यांच्यासह युवक राष्ट्रवादीचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष तथा लासुरे येथील रहिवासी अजय रंगराव देवरे; पंचायत समितीचे माजी सभापती तथा पिंपळगाव हरेश्‍वर येथील रहिवासी देविदास रामदास महाजन; लासुरे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य कपिल शिवाजी देवरे, लासुरे येथीलच सामाजिक कार्यकर्ते पंकज सुभाष देवरे, पाचोर्‍याचे माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ता शेख रसूल शेख उस्मान; पाचोरा येथील अल्पसंख्यांक कार्यकर्ता फिरोज पिंजारी; भडगाव येथील बशीर करीम शेख; कामरान बशीर शेख; इलियास अब्बास अली; शाहबाज इफ्तीखार सय्यद, अहमद शमीउद्दीन शेख; भडगाव येथील सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक बशीर शेख, भडगाव येथीलच राजू शेख; अभियंता मोहन परदेशी, वकील संघाचे सदस्य मोहसीन शेख; सामाजिक कार्यकर्ता साबीर शेख; शफीक टेलर, उषाताई परदेशी, गायत्रीताई पाटील, शब्बीर खान, शेख इब्राहिम, शेख अख्तर मुल्ला; शेख सलीम, अजमल खान, शेख खालीक; जुवार्डी येथील माजी सरपंच नाना रामदास पाटील, जुवार्डी विकासो चेअरमन प्रकाश रामराव पाटील, शिवाजी लक्ष्मण पाटील, आबा  पाटील व संजय शिवराम पाटील या मान्यवरांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे, संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी खासदार उन्मेष पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, ज्येष्ठ नेत्या वैशाली सुर्यवंशी, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी उध्दव ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून या नेत्यांच्या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात पक्षाला मोठ्या प्रमाणात बळकटी मिळून लोकसभा निवडणुकीत याचे प्रतिबिंब उमटणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आपल्या मनोगतातून पाचोरा-भडगाव मतदारसंघात वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रयत्नांना डॉ. अस्मिता  पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांमुळे मजबुती मिळणार असल्याचे प्रतिपादन केले. तर, वैशाली सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून विविध मान्यवरांचे पक्षातील आगमन हे स्वागतार्ह असून हा विरोधकांना सुरूंग लागला असून याचे आगामी काळात नक्कीच पडसाद उमटणार असल्याचे प्रतिपादन केले.


 

Tags: #delhi #mumbai news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/shivsena-udhav-thakre-incomig/
Previous Post

भावाच्या अपरोक्ष शेतजमीन नावावर करून केली परस्पर विक्री, गुन्हा दाखल

Next Post

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जामनेर शहरात निघाली मिरवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जामनेर शहरात निघाली मिरवणूक

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जामनेर शहरात निघाली मिरवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon