पारोळा शहरात कार्यकर्त्यांचा एकजुटीचा निर्धार
पारोळा (प्रतिनिधी) :- पारोळा तालुका आणि शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या संदर्भात एक जाहीर मेळावा आज शनिवार दि. १२ जुलै रोजी दुपारी १ वाजता राधाकृष्ण मंगल कार्यालय, मार्केट कमिटी, पारोळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या मेळाव्याला शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, जिल्हा संघटक करण पाटील, युवा सचिव विराज कावडिया, माजी जि. प. सदस्य डॉ. प्रवीण पाटील, उपसभापती रवींद्र पाटील, तालुका प्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे, अनिल पाटील, बाळू नाना पाटील, दौलत पाटील, माजी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, माजी नगरसेवक बापू महाजन, पी. जी. पाटील, भय्या चौधरी, गौरव बडगुजर, रावसाहेब गिरासे, एन. डी. पाटील यांच्यासह तालुक्यातील व शहरातील अनेक निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक नेत्यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका मोठ्या उत्साहात आणि जोशाने लढवून विजयश्री प्राप्त करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.