जळगाव (प्रतिनिधी) – महापालिकेच्या भाजपच्या दोन नगरसेविकांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश केला. उषा संतोष पाटील आणि शेख हसीना अशी प्रवेश करणाऱ्या नगरसेविकांची नावे आहेत. यामुळे पालिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे शहराचा सत्यानाश झालेला असतांना १०० कोटींच्या वल्गना भाजपकडून करण्यात आला. शहराचा विकास यांना करता येत नाही . जळगाव शहर सुरेशदादा जैन यांच्या काळात जे सुंदर शहर होते. तसेच सुंदर शहर करण्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. प्रथमदर्शनी विविध प्रभागांमध्ये विकासकामे सुरु आहेत असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.