जळगाव (प्रतिनिधी ) – युवासेना व महापौर सेवा कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.शहरातील पंडित नेहरू चौक, जुन्या जळगावमधील रथ चौक, मेहरुणमधील विठ्ठल मंदिर चौकात महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते तर काव्यरत्नावली चौकात युवा सेनेचे विस्तारक किशोर भोसले, शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांच्या हस्ते. ख्वाजामियाँ चौकात शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.