मुंबईत शासकीय बंगल्यात प्रतिमापूजन
मुंबई (वृत्तसेवा) : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी दिलेला स्वराज्याचा मंत्र आणि त्यांच्या राज्यकारभारातील लोकहितवादी धोरणे आजही प्रशासनास मार्गदर्शक ठरतात. युवकांनी शिवरायांच्या विचारांवर चालत समाजहितासाठी योगदान द्यावे. असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी केले.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुंबई येथील त्यांच्या ‘ जेतवन ‘ या शासकिय बंगल्यावर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास मुंबई व जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. जय भवानी – जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला.