नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील शिवनेरी ग्रुप आणि पंकज पाटील मित्र परिवारातर्फे मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच दत्त जयंतीच्या पावन मुहूर्तावर भव्य कीर्तन सोहळा गुरुवार दि. ४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, किर्तन सोहळ्याला उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शिवनेरी ग्रुपचे प्रमुख पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत शिव कॉलनी येथील चांदणी चौकातील मैदानात घेण्यात येणार आहे. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला हेल्मेट वाटप केले जाणार आहे.
तसेच श्री दत्त जयंतीच्या पावन मुहूर्तावर कीर्तनकार ह. भ. प. रविकिरण महाराज (दोंडाईचाकर) यांचे कीर्तन गुरुवार दि. ४ डिसेंबर रोजी रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत चांदणी चौकातील मैदानात आयोजित करण्यात आले आहे. भाविकांनी कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवनेरी ग्रुप, पंकज पाटील मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.









