विद्यार्थ्यांनी सादर केले नृत्य
शिरसोली (वार्ताहर) : येथील देवेंद्र प्रमोद पाटील प्राथमिक विद्यामंदिर, हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय व जगतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, शिरसोली प्र.बो. येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना प्रमोद पाटील ह्या होत्या तर पाहुणे म्हणून शाळेचे चेअरमन प्रमोद जगतराव पाटील होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन कल्पना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात इयत्ता ५ वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी शिवाजी महाराजांचा पाळणा व नृत्य सादर केले. शिक्षकांमधून रोहिणी भिमराव सूर्यवंशी, ज्योती कैलास सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात शिवाजी महाराज्यांच्या कार्याचा परिचय करून दिला. शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य कसे उभे केले? याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ८वी चीविद्यार्थिनी पूर्वी निलेश झुरके यांनी केले. आभार प्रदर्शन खुशबू सुनील पाटील यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.