एरंडोल ( प्रतिनिधी ) – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासंदर्भात भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे याने काल अतिशय खालच्या दर्जाचे आक्षेपार्ह ट्विट केले त्याच्या निषेधार्थ आज एरंडोल शहर शिवसेना व युवासेनेच्या वतीने निलेश राणे याच्या पुतळ्याचे धरणगाव चौफुली येथे दहन करण्यात आले.
यावेळी शिवसैनिकांनी निलेश राणे याच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. याप्रसंगी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन यांनी निलेश राणे यांच्यावर प्रहार करताना सांगितले की निलेश राणे हे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आहेत, एका जबाबदार लोकप्रतिनिधी विषयी बोलताना एवढ्या हीन पातळीवर वक्तव्य करणे अतिशय निंदनीय आहे, राणे कुटुंबीयांकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा तरी कशी धरता येईल. राणे कुटुंबीयांनी कोणावरही टीका करताना आपला भूतकाळ विसरू नये आज जे काही त्यांच्याकडे आहे ते फक्त आणि फक्त शिवसेनेच्या जोरावर आहे हे त्यांनी विसरू नये.
यावेळी रास्तारोकोदेखील करण्यात आला याप्रसंगी स पो नि.तुषार देवरे यांच्याकडे निलेश राणे याच्याविरोधात फिर्याद देऊन योग्य कारवाई करून अटकेची मागणी करण्यात आली…
याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, तालुका संघटक माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन, नगरसेवक चिंतामण पाटील, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य आनंदा चौधरी, माजी नगरसेवक सुनील चौधरी, माजी नगरसेवक नितीन बिर्ला, राजेंद्र महाजन, परेश बिर्ला, विकी खोकरे, सुनील चौधरी, ऍड. प्रेमराज पाटील, अमोल भावसार, कुणाल पाटील, मोहन महाजन, प्रसाद महाजन, राजेश महाजन, जयेश महाजन, गणेश चौधरी, गोविंदा बिर्ला, चेतन महाजन, राजू महाजन, आदी शिवसैनिक उपस्थित होते…