जामनेर ( प्रतिनिधी ) – मुंबईतील शिवतीर्थ मैदानावर दसरा मेळावा शिवसेना साजरा करणार की शिंदे गट ? , याबाबत न्यायालयाकडून निकाल आला की शिवतीर्थ मैदानावर दसरा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच होईल. हा निकाल येताच जामनेर तालुका शिवसेना पक्षाने जामनेर येथील नगरपालिका चौकात आणि पहुर येथील बसस्थानक परिसरात फटाके फोडुन आणि मिठाई भरवत आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी युवासेना उपजिल्हा युवा प्रमुख विश्वजित मनोहर पाटील, तालुका युवा प्रमुख विशाल लामखेडे, शिवसेना जामनेर शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ, उपतालुकाप्रमुख अशोक जाधव, उपतालुका संघटक सुधाकर सराफ, उपशहर प्रमुख दिपक माळी, पहुर शहर प्रमुख संजय तायडे, मयुर पाटील, आनस खान, गणेश पाटील, सुकलाल बारी, आनिल पाटील, अमोल राजपूत, ईश्वर चोरडीया, भाऊराव गोंधनखेडे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.