जळगाव (प्रतिनिधी) आईला विजेचा धक्का लागला असतांना प्रसंगावधान राखून मोठे धाडस करत साडेसहा वर्षीय चिमुकल्या मुलीने आईचे प्राण वाचविले. तिच्या या हिंमतीची दखल म्हणून आज प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले
आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देशातील बाल शौर्य विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोरोनाच्या आपत्तीमुळे हा कार्यक्रम ऑनलाईन या प्रकारात घेण्यात आला. यात जळगाव येथील शिवांगी काळे या साडेसहा वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे.