भुसावळ ( प्रतिनिधी ) – कोरोना मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत द्या अशा मागणीचे पत्र शिशिर जावळे. यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या वारसांना भरपाई देण्याबाबत केंद्र सरकारने राज्यांना दिलेल्या निर्देशांनुसार सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे.न्या. एम . आर . शहा आणि ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने सांगितले की, कोणतेही राज्य एखाद्या कोरोनाने मृत झालेल्याच्या कुटुंबाला केवळ मृत व्यक्तीचा मृत्यू प्रमाणपत्रावर कोरोना नोंदले नाही. या आधारावर भरपाई देण्यास नकार देऊ शकत नाही. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येक राज्याने त्यांच्या आपत्ती विभागाच्या निधीतून 50 हजार रुपये भरपाई द्यावी ही .भरपाई केंद्र आणि राज्य द्वारा देण्यात येणाऱ्या अन्य मदत व कल्याण रकमेपेक्षा भिन्न असेल भरपाई रक्कम पीडित कुटुंबियांना त्यांनी केलेल्या अर्जाच्या 30 दिवसाच्या आत द्यावी. भरपाई रकमेचे देयक राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीच्या माध्यमातून देण्यात येतील. पिडीत जिथे भरपाई करण्याची मागणी करीत असेल त्या ठिकाणी राज्यांनी यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्यात समिती स्थापन करून अधिसूचना जारी करावी.
महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार युद्धपातळीवर कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येक जिल्हावार समिती स्थापन करून मदत अदा करावी असे पत्र सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे , आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठविले आहे.