जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगावात आज महाराष्ट्र शिक्षक चाचणी परीक्षा ( महाटेट ) सुरळीत पार पडली .
या परीक्षेसाठी जिल्हा परीक्षा आयोजन व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आणि उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत या समितीने परीक्षेचे नियोजन केले होते . पहिल्या पेपरला ६९११ पैकी ६०७१ आणि दुसऱ्या पेपरला ५७९० पैकी ५१९४ परीक्षार्थी उपस्थित होते . पहिल्या पेपरसाठी २२ केंद्रांवर ५ झोन अधिकारी , २२ सहाय्यक परिरक्षक व २२ केंद्रसंचालक नेमण्यात आले होते . दुसऱ्या पेपरसाठी १८ केंद्रांवर ४ झोन अधिकारी , १८ सहाय्यक परिरक्षक व १८ केंद्रसंचालक नेमण्यात आले होते . सर्व उमेदवारांना बहुसंची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती . जिल्हा परीक्षा नियंत्रण कक्षात उपशिक्षणाधिकारी सतीश चौधरी , राजेंद्र सपकाळे , शिक्षण विस्तार अधिकारी रविकिरण बिऱ्हाडे , विजय पवार , एजाज शेख , रागिणी चव्हाण , सरला पाटील , कक्ष अधिकारी प्रतिभा सुर्वे , अमल चौधरी , मिलिंद सुपे यांचा समावेश होता . माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण व डॉ डी एम देवांग यांचा भरारी पथकात समावेश होता . प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील , परिविक्षाधीन उपशिक्षणाधिकारी हेमंत उशीर , संदीप पाटील आदींनी या परीक्षेच्या संचालन आणि आयोजनासाठी सहकार्य केले .







