ग्रामस्थांनी प्रश्नोत्तराद्वारे घेतले जाणून
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली येथे आयकर विभागातर्फे इन्कम टॅक्सविषयी माहितीपर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
आगाऊ कर भरणे व आयटी रिटर्न भरणे आवश्यक आहे. कॅश व्यवहार करताना काळजी घेतली पाहिजे. बचत खात्याने लाखो रुपयांचा व्यवहार करताना काळजी घेतली पाहिजे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली प्रसंगी ग्रा.प.उपसरपंच शशिकांत अस्वार, सदस्य श्रावण ताडे, मिठाराम पाटील, पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी उपस्थित होते. प्रसंगी ग्रामस्थांनी प्रश्नोत्तराद्वारे माहिती जाणून घेतली.
यावेळी आयकर विभागाचे अधिकारी मनोज पवार, राकेश रंजन, अशोक शर्मा, कुणाल वाघ या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. कर सल्लागार दयानंद चव्हाण, अनिल लोहार, योगेश बारी (फुसे), नीलेश खलशे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले.