जळगाव तालुक्यात पाचोरा रस्त्यावर घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील तरुण जळगाव येथून घरी जात असताना शुक्रवार दि. २ रोजी भीषण अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान सोमवारी सकाळी उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची नशिराबाद पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
विनोद गोविंद हटकर (वय ३५, रा. ओम नगर, शिरसोली प्र. बो. ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. गावात तो परिवारासह राहत होता. (केसीएन)दरम्यान शुक्रवारी दि. २ मे रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास तो जळगाव येथून घरी जात असताना रायसोनी महाविद्यालयाच्या पुढे दुचाकीला अपघात झाला.या अपघातात विनोद गंभीर जखमी झाला त्याला कुटुंबीयांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.
दरम्यान उपचार सुरू असताना सोमवार दि. ५ मे रोजी सकाळी ८. ४० वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.(केसीएन)या वेळेला कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेमुळे शिरसोली गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.