गावातील पहिल्याच सहायक पोलीस निरीक्षक
जळगाव (विशेष वृत्तांत) : तालुक्यातील शिरसोली येथील पोलीस उपनिरीक्षक ज्योत्स्ना हेमंत पाटील यांना नुकतीच शासनातर्फे पदोन्नती जाहीर झाली असून आता त्या एपीआय अर्थांत सहायक पोलीस निरीक्षक झाल्या आहेत. गावातील महिलांमधून ज्योत्स्ना पाटील ह्या पहिल्याच एपीआय असून त्यांच्या यशाबद्दल शिरसोली पंचक्रोशीत आनंदोत्सव साजरा होत आहे. एकाच घरातील पती व पत्नी हे मोठ्या हुद्द्यावर असणे बहुधा पहिलेच उदाहरण आहे.
शिरसोली येथील धनराज हिरामण पाटील हे गरीब परिस्थितीतून व शून्यातून उभे राहिलेले आहेत. त्यांचे चिरंजीव हेमंत धनराज पाटील हे जालना जिल्ह्यातील परतूर येथे बँक ऑफ महाराष्ट्र येथे शाखा व्यवस्थापक आहेत. तर धनराज पाटील यांच्या सून तथा हेमंत पाटील यांच्या पत्नी ज्योत्स्ना हेमंत पाटील या पीएसआय म्हणून निवड झालेल्या आहेत. ज्योत्स्ना पाटील यांचे माहेर खोटे नगर, जळगाव येथील असून मूळचे ते शिंदखेडा येथील आहेत. तर २०१४ ला ज्योत्स्ना पाटील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून परीक्षा उत्तीर्ण झाल्या. तर त्यांची १११ वि बॅच आहे.
महिलांमध्ये शिरसोली येथील पहिल्याच एपीआय असण्याचा त्यांना आता बहुमान मिळाला आहे. त्यांची पदोन्नती मुंबई येथे राज्य गुप्तवार्ता विभागात झाली आहे. एकाच घरातील पती व पत्नी हे मोठ्या हुद्द्यावर असणे बहुधा पहिलेच उदाहरण आहे. ज्योत्स्ना पाटील यांना पती, १ मुलगा, १ मुलगी, सासू, सासरे असा आनंदी परिवार आहे. ज्योत्स्ना यांच्या यशाबद्दल सर्व क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.