• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरसोली रस्त्यावर १३६३ झाडांची यशस्वी लागवड ; पहिला वाढदिवस साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2025
in vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, जैन कंपनी, भारत, महाराष्ट्र
0
शिरसोली रस्त्यावर १३६३ झाडांची यशस्वी लागवड ; पहिला वाढदिवस साजरा

गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन हिल्स येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

जळगाव ( प्रतिनिधी ) – गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने ५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जैन हिल्स परिसरात, तसेच जैन प्लास्टिक पार्क बांभोरी येथे वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम राबविण्यात आला. तसेच सन २०२४-२५ या वर्षात शिरसोली रस्त्याच्या दुतर्फा एकूण १३६३ झाडांची लागवड यशस्वी करण्यात आली आहे. यामध्ये उन्हाळ्यात टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा, झाडांचे संगोपन व संवर्धन यांसारखी कामे वेळापत्रकानुसार पार पाडण्यात आली असून, सध्या या झाडांची जिवंत टक्केवारी सुमारे ८५% आहे. या सर्व झाडांचा पहिला वाढदिवस आजच्या जागतिक पर्यावरण दिनी साजरा करण्यात आला.

या उपक्रमात सुरेंद्र वाणी व जळगाव सायकलिस्ट ग्रुपचे मोहन गाढे, निलेश चौधरी, राम घोरपडे, इरफान पिंजारी, भूपेश व्यास, सखाराम ठाकरे, रुपेश महाजन, प्रमोद नारखेडे, चेतन महाजन, राजेश चव्हाण, कामिनी धांडे, अजय ढेकळे, आरती व्यास, सुरजकुमार नेमाडे, यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. वन विभागाचे अधिकारी योगेश दीक्षित, उमाकांत कोळी, हरीश थोरात, भागवत तेली, अजय रायासिंग, गोकुळ सपकाळे आणि सामाजिक वनीकरण विभागातील रोहिणी थोरात यांनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या परिसरात वन्यप्राणी आणि वृक्ष संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले. हरित सेना प्रमुख प्रवीण पाटील, प्राध्यापक शिवराज पाटील, तसेच महापालिका कर्मचारी वसंत पाटील यांनी निमखेडी रस्त्याच्या दुतर्फा आणि परिसरातील मोकळ्या जागांमध्ये वृक्ष लागवड केली.

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोहन गाढे यांच्या हस्ते हेलिपॅड परिसर आणि गौराई ग्राम उद्योग जवळील रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी जळगाव सायकलिस्ट ग्रुप, हरित सेना, वन विभागाचे कर्मचारी आणि सुरेंद्र वाणी तसेच गांधी रिसर्च फाउण्डेशनचे समन्वयक उदय महाजन, अब्दुल भाई, गिरीश कुलकर्णी, जैन इरिगेशनच्या गार्डन विभागाचे अजय काळे, राजेंद्र राणे, व गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे वितरित करण्यात आली.

गिरीश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र नेटके, भागवत तेली, राम घोरपडे आणि मोहन गाढे यांनी आपल्या मनोगतातून पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. राजेंद्र राणे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे विक्रम अस्वार, प्रशांत सूर्यवंशी, प्रसाद सोनवणे, प्रकाश बारी व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण उपक्रम
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून २०२५ रोजी जैन प्लास्टिक पार्क, बांभोरी येथे आत्मन जैन व अभंग जैन यांच्याहस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम झाला. पर्यावरण रक्षणाच्या हेतूने आयोजित या उपक्रमात कंपनीतील सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमात डॉ. जनमेजय नेमाडे, सी. एस. नाईक, अतिन त्यागी, आर. व्ही. सरोदे, आर. एस. पाटील, डॉ. योगेश. डी. बाफना यांची उपस्थिती लाभली. आरंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध प्रजातींच्या झाडांचे रोपे लावण्यात आले. पर्यावरण संतुलन टिकवण्यासाठी, हरित क्षेत्र वाढवण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी शुद्ध वायू निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraशिरसोली रस्त्यावर १३६३ झाडांची यशस्वी लागवड ; पहिला वाढदिवस साजरा
Previous Post

क्रीडा संकुलाजवळ तरुणाकडून पिस्टल, काडतुस जप्त

Next Post

डोक्यात लोखंडी रॉड घालून वृद्ध महिलेची हत्या, आरोपींचा शोध सुरु

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डोक्यात लोखंडी रॉड घालून वृद्ध महिलेची हत्या, आरोपींचा शोध सुरु

डोक्यात लोखंडी रॉड घालून वृद्ध महिलेची हत्या, आरोपींचा शोध सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon