गावातून निघाली वृक्षदिंडीची प्रभात फेरी
शिरसोली (वार्ताहर) :- हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय, शिरसोली प्र.बो. येथे आज दि. ५ जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रथम गावात वृक्षदिंडीची प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे ‘ झाडे लावा झाडे जगवा’ ” एक पेड माॅ के नाम ” अशा प्रकारे विविध घोषणा दिल्या.
गावात प्रभात फेरीमध्ये विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य सादर केले. प्रभात फेरीनंतर शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. के. एस. ढेपले, डी. जे. पाटील, एस.के.पाटील, शाळेचे मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणानंतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.एस.ढेपले (वनपाल सामाजिक वनीकरण जळगाव) ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून डी.जे.पाटील (वनरक्षक), एस.के.पाटील (वनरक्षक), संस्थेचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष, प्रेरणा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष जगतराव बारकू पाटील, प्रमोद जगतराव पाटील(शालेय समिती चेअरमन), शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील होते. के.एस.ढेपले मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणात वनाचे महत्त्व, वनांचे संरक्षण कसे करावे ? याबाबतीत मार्गदर्शन केले. तसेच एस.के. पाटील यांनी झाडाचे किती महत्त्व आहे ? झाडामुळे माणसाला कसे फायदे होतात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. प्रस्ताविक कल्पना पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले. तर आभार एस.के.पांडे यांनी मानले.