जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालय शाळेमध्ये दि. १५ रोजी सन २००१-०२ च्या येथील दहावीच्या विद्यार्थ्यांनी मैत्री सोहळा साजरा केला. या कार्यक्रमात २००२ वर्षात जे शिक्षक, लोक व शिपाई कर्मचारी होते, त्यांचा सत्कार या माजी विद्यार्थ्यांनी केला.
कार्यक्रमास उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, पी. पी. कोल्हे, पी. एल. काटोले, पी. टी. बारी,आर. के. पाटील, एम. एस. पाटील, डी. जी. कुलकर्णी, जी.व्ही. बारी, एस. पी. पाटील, वैष्णव, अकोले, कोळी, आणि शिपाई कर्मचारी यांची उपस्थिती होती. शाळा भरण्याची सुरुवात जशी होते तशी शाळेची घंटा वाजवून कार्यक्रमाची सुरुवात केली.
दीप प्रज्वलन करून वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाच पाच मिनिटं शिकवले. त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा सत्कार आणि त्यांचे मनोगत झले. विद्यार्थ्यांचे मनोगत झाले. कार्यक्रमात एकूण ११५ विद्यार्थी हजर होते, या विद्यार्थ्यांनी शाळेला भेट म्हणून एक ब्लॅकबोर्ड दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष आंबटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.