क्रीडा शिक्षक संजय काटोले यांचे मार्गदर्शन
इतर विद्यार्थ्यांनी देखील उत्तेजनार्थ बक्षीस मिळवून आपल्या खेळात चमक दाखवली. या विद्यार्थ्यांना विद्यालयातील क्रीडा शिक्षक संजय काटोले यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, संस्थेचे चेअरमन अर्जुन काटोले, सचिव सुरेश अस्वार, शालेय समितीचे अध्यक्ष दिलीप बारी, संचालक तथा शालेय समितीचे सदस्य निलेश खलसे, प्रवीण पाटील, मनोज बारी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.