शासकीय नोकरीत झाली निवड
जळगाव (प्रतिनिधी) :- शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा महाराष्ट्र शासनाच्या नोकरीमध्ये निवड झाल्याबद्दल विद्यालय परिवारातर्फे सत्कार ठेवण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण पाटील ,अशोक बावस्कर, सुनील भदाणे, चंद्रकांत कुमावत,भरत बारी, क्रीडा शिक्षक संजय काटोले, आशा कोळी, देवका पाटील, मनीषा बारी, मनीषा पायघन तसेच सत्कारार्थी म्हणून रेश्मा मिसाळ, भूषण काटोले,चंद्रकांत नाईक हे उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांचे सत्कार अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आला. सत्कारार्थी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये माजी विद्यार्थ्यांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी यांनी केले. तर आभार घनश्याम काळे यांनी मानले.