जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली प्र.न.येथे ज्ञानविकास क्लासेसतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी कृषी व परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर, माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच हिलाल भिल्ल हे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धा, पोवाडा व गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. यावेळी धनश्री पाटील या विद्यार्थिनीचे भाषण आकर्षक ठरले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रजनीकांत अस्वार यांनी केले. आभार मनीष पाटील यांनी मानले. यावेळी ग्रामपंचायत मधील सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.