शिरसोली वा (प्रतिनिधी) : – येथील हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय, शिरसोली प्र.बो. येथे शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिवाळी क्रीडा स्पर्धांची सुरुवात करण्यात आली.क्रिडा स्पर्धांचे आयोजन एस.के.पांडे यांनी केले.
क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. क्रिडा प्रकारामध्ये कबड्डी, खो-खो, धावणे, लंगडी, दोरी उड्या इत्यादी क्रीडा प्रकारचा समावेश करण्यात आला आहे. क्रिडा स्पर्धा यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व्हि.आर.पाटील, कामिनी पाटील, ज्योती पाटील, योगिता बडगुजर, ज्योती धनगर, मनिषा पाटील इत्यादी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.