माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
शिरसोली (प्रतिनिधी):- येथील श्री साई गजानन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थानच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, त्यांचे विश्वासू सामाजिक कार्यकर्ते व वारकरी शांताराम श्रावण ठाकूर यांच्याकडून मंदिर कामासाठी बोअरवेल खोदकाम करण्यात येत आहे.

गावाचे ज्येष्ठ नागरिक व माजी सरपंच कौतीक दोधू ठाकूर आणि श्रावण दोधू ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार होत आहे. उद्या, मंगळवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी ठीक ८ वाजता मंदिर परिसरात हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या प्रसंगी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर स्वतः उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते बोअरवेलच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. “पुढची तरुण पिढी समाजोपयोगी कामासाठी, तसेच देव, देश आणि धर्मासाठी एकत्र येत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. श्री साई गजानन महाराजांच्या आशीर्वादाने हे सेवाकार्य घडत आहे, असे संस्थान प्रतिनिधी यांनी सांगितले आहे.
श्री साई गजानन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थान, शिरसोली यांच्या वतीने सर्व ग्रामस्थांना आणि भाविकांना या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शांताराम माऊली व संस्थानच्या वतीने सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना यावेळी करण्यात आली.









