जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसोली येथे शासकिय होमिओपॅथी महा- विद्यालये व रेड क्रॉस दवाखाना यांच्या अंतर्गत मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिरला उस्फूर्त शिबिराचे उद्घाटन ९ जून रोजी करण्यात आले उद्घाटन प्रसंगी ग्रा.पं. सदस्य शितल खलसे, तालुका सरचिटणीस गिरिश वराडे, भा.ज.पा. शक्ती केंद्र प्रमुख सुशिल बारी, विघ्नहर्ता लॅबचे संचालक रूपेश माळी असे अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
९ ते १४ जून असे सलग सहा दिवस डॉ. मिताली पाटील डॉ.ऋषिकेश खालकर, डॉ. धुनसी वेदवान, डॉ.मोनिका जाधव अशा तज्ज्ञ डॉक्टरांनी २०० रुग्णांना तपासणी करून रुग्णसेवा केली. या शिबिरा अंतर्गत रुग्णांची मोफत रक्त तपासणी व इसीजी करण्यात आले. या शिबिरातून संदर्भित केलेल्या रुग्णांना शासक्रिय योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया, व पुढील उपचार येणार पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहेत, मदतनीस म्हणून राखी वाणी, आदित्य आचारे शिबिराच्या यशस्वीतेसाठी अमोल बारी , स्वप्नील पाटील, रूपेश माळी यांचे सहकार्य लाभले.