वार्षिक सर्वसाधारण सभेत १० विषय सर्वानुमते मंजूर
जळगाव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसोली येथील शिरसोली विविध कार्यकारी सोसायटीला १०० टक्के वसुली झाल्याने ८ लाख २२ हजारांचा नफा झाला असून नियमित कर्ज फेडणाऱ्या सदस्यांचा सत्कार करण्यात येऊन वार्षिक सर्वसाधारण सभेत १० विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
शिरसोली विकासोची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात चेअरमन अँड . विजय बारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. संस्थेने मागील आर्थिक वर्षात रु.2 कोटी मात्र ची कर्ज वाटप केलेली होती, संस्था स्तरावर 100 टक्के वसुली व काही प्रमाणात मागील थकबाकी वसूल झाल्याने संस्थेस रु. 8,28,000/- मात्र नफा झालेला आहे.
मयत सभासद यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेस सुरुवात झाली , सुरवातीस सचिव यांनी प्रस्तात्विक केले,त्यानंतर एक लाखवरील नियमित कर्जफेड करणारे सभासदांचा शाल,श्रीफळ व फुल देऊन चेअरमन व संचालक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर विषय पत्रिके वरील सर्व 10 विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सभेस संचालक सुभाष अस्वार, बाळू पाटील,रामकृष्ण नेटके,गोकुळ आंबटकर,ज्ञानेश्वर माळी उत्तम अस्वार, मिठाराम पाटील,रामकृष्ण बारी व सभासद उपस्थित होते.सभेच्या शेवटी अल्पोहर व चहा पाण्याचं कार्यक्रम होऊन सभा संपल्याचे जाहीर केले, सभेसाठी लिपिक समाधान काटोले व सेल्समॅन निवृत्ती पाटील यांनी परिश्रम घेतले. सभेला केशव आंबटकर,सुरेश माळी, रामदास पाटील,कौतिक ठाकूर,एकनाथ ताडे,रघुनाथ ताडे,मोहन अस्वार,नाना माळी आदी सभासद उपस्थित होते.