शिरसोली (प्रतिनिधी) – शिरसोली प्र.न. येथे वार्ड.क्र.६ मध्ये १५ वित्त आयोग ग्रामपंचायत निधीतून नविन प्लाँट भागात पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ आज माजी उपसरपंच शेनफडू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सरपंच हिलाल मल्हारी भिल्ल, उप सरपंच यांचे पती मिठाराम पाटील, विकासो माजी चेअरमन वासु बोरसे, ग्रा.प. सदस्य श्रावण ताडे, शाम अस्वार, रामकृष्ण काटोले, मुदस्सर पिंजारी, गौतम खैरे, विनोद अस्वार, गोकुळ ताडे, भगवान बोबडे, विठ्ठल रुक्मिणी संस्थेचे उपाध्यक्ष नाना हवलदार, मराठा उद्योजक मंडळ सदस्य संजय सुर्यवंशी, मराठा समाज अध्यक्ष उमाजी पानगळे, आरोग्य सेवक विलास महाजन, सईद पिंजारी, गंगाराम माळी,निलेश वाणी,शिवाजी पाटील हे उपस्थित होते.