मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती
शिरसोली (वार्ताहर) : जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे विवेकानंद फाउंडेशन संचलित विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वामी विवेकानंद जयंती व जिजाऊ जयंतीनिमित्त स्नेहसंमेलन पार पडले. यात प्री प्रायमरी व प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनपर, व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलन यावर नाटके सादर केली. माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्म ते शिवराज्याभिषेक यावर शिवोत्सव थीमद्वारे जिवंत देखावे व मनोरे सादर केले.
दरम्यान कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवित शाळेचे कौतुक केले. याप्रसंगी बोदवड नगरपरिषदचे मुख्याधिकारी गजानन तायडे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, केंद्रप्रमुख सुशील पवार, तसेच संस्थेचे अध्यक्ष गोपाल काटोले, उपाध्यक्ष कमलेश बारी, सचिव किरण बारी, कार्यकारी संचालक विजय पाटील, विवेकानंद फाउंडेशन शिरसोली प्र. न. चे संचालक समाधान पाटील तसेच प्राचार्य विजय वाणी, पर्यवेक्षक शिवाजी मराठे तसेच ग्रामपंचायत शिरसोली प्र बो व ग्रामपंचायत शिरसोली प्रन चे सदस्य आणि संस्थेचे सर्व संचालक हजर होते.