जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय व जगतराव बारकू पाटील उच्च माध्यमिक विद्यालय शिरसोली येथे इयत्ता १० व १२ वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक जगतराव बारकू पाटील होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी वाय.एन ठोसरे, शालेय समिती चेअरमन प्रमोद जगतराव पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना प्रमोद पाटील होत्या. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानांतर्गत बोर्डाच्या सूचनांची माहिती मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात आप्पासो जगतराव बारकु पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.नंतर अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.