जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : बारी समाजाच्या हितासाठी संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाल्याबद्दल बारी समाजाच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं स्वागत व सत्कार समारंभ रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी शिरसोली येथे पार पडला.
सूर्यवंशी बारी पंचमंडळ, वीरता मित्र मंडळ, विवेकानंद फाउंडेशन, राम राज्य ग्रुप, अशोक नगर बॉईज, सहकार्य मित्र मंडळ , वीरता मित्र मंडळ, बारी समाज शिरसोली व भजनी मंडळ ग्रुप यांच्या वतीने गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी नवरात्र निमित्त विविध मंडळाची आरती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिंदे सरकारच्या वतीने विविध योजनांची माहिती सांगितली. तालुकाप्रमुख शिवराज पाटील, दुध फेडरेशन संचालक रमेश पाटील, सरपंच हिलाल आप्पा भिल्ल, माजी तालुकाप्रमुख नंदू पाटील, माजी सरपंच शेनफडू पाटील, लाडकी बहिण योजनेचे जळगाव तालुका अध्यक्ष अर्जुन गजमल पाटील, प्रा. विजय पाटील, युवा सेना तालुका प्रमुख रामकृष्ण काटोले,विकासो चेअरमन बालू पाटील,ग्रा.प.सदस्य विनोद बारी, गौतम खैरे,सह प्रकाश रोकडे,बंडू काळे, सुनिल पाटील,विजय काटोले, रामकृष्ण काटोले,व बारी पंच मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.