शिरसोली ( प्रतिनिधी ) – शिरसोली प्र.बो. येथे सरपंच प्रदीप रावसाहेब पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त सरपंचपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली.
चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत प्रवीण अशोक बारी यांना ११ तर सौ.उषाबाई अर्जुन पवार यांना ६ मते मिळाली. त्यामुळे प्रवीण बारी यांची सरपंचपदी निवड झाली. या वेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व पं.स.चे माजी सभापती नंदलाल पाटील, अँड. प्रवीण पाटील, अँड. विजय काटोले, राजू ताडे, मुरलीधर ढेगळे, सुनील पाटील, प्रशांत बारी उपस्थित होते. निर्वाचित सरपंच बारी यांनी गावातील पाण्याचा व स्वच्छतेचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे सांगितले.
सरपंचपदी निवड झाल्यानंतर प्रवीण बारींचा सत्कार करताना पदाधिकारी