शेंदुर्णी ता. जामनेर (प्रतिनिधी ) – येथील माहेर असलेल्या प्राजक्ता बारी हिची सासरच्या मंडळींकडून गळफास देऊन हत्या करण्यात आली असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला असून याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना नुकतेच निवेदन देण्यात आले . तिच्या मृत्यूस जबाबदार आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीना कठोर शासन व्हावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय गरुड ,माजी पं. स. सदस्य सुधाकर बारी, माजी जि.प. सदस्य कैलास पाटील आदी उपस्थित होते. गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी जळगाव येथे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे यांच्याशी भ्रमण ध्वनीद्वारे बोलून कारवाईचे आदेश दिले.
उपमुख्यमंत्री.ना. अजितपवार, .ना. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन जामनेर तालुक्यातील विविध प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळणे बाबत सविस्तर चर्चा केली व शेतकऱ्यांना त्वरित मोबदला मिळणे बाबत निवेदन दिले. जामनेर तालुक्यातील प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळावा अशी मागणी उपमुख्यमंत्री मा.ना. अजित पवार, जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांची भेट घेऊन काल संजय गरुड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.