शिरसोली वार्ताहर- येथील बारी समाज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात आज ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन दिलीप बारी हे होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष निलेश खलसे, उपाध्यक्ष पंडित जाधव, सचिव सुरेश अस्वार, खजिनदार कमलाकर तांदळे, मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज बारी, मणियार विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी युवा कुमार रेड्डी, प्रा. गणपत धुमाळे, संचालक अर्जुन काटोले, शशिकांत वाणी, प्रवीण पाटील, राजेश आंबटकर, भास्कर काटोले, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील मंचावर उपस्थित होते. प्रथम माता सरस्वती व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन दिलीप बारी यांनी केले. त्यानंतर दिलीप बारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच संविधानाचे वाचन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे यांनी केले. तंबाखू मुक्ती व साक्षरतेची शपथ घेण्यात आली. त्यानंतर क्रीडा शिक्षक संजय काटोले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संगीत कवायत व देशभक्तीच्या गाण्यावर अप्रतिम असे लेझीम सादर केले. प्रसंगी विद्यार्थ्यांनी वर्षभरात विविध गुणदर्शन व क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात विविध प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
त्यानंतर गुणवंत शिक्षकांचे देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख चंद्रकांत कुमावत यांनी केले. आभार दीपक कुलकर्णी यांनी मानले. ध्वजारोहणासाठी विद्यार्थी, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक प्राथमिक विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









