माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
शिरसोली (वार्ताहर) :- येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली. तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिन सुद्धा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर हे होते. प्रमुख अतिथी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाल बारी, विज्ञान सहाय्यक गोपाल बारी लिपिक राजेंद्र खलसे, हर्षल बारी हे उपस्थित होते. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गोपाल बारी यांनी मनोगत व्यक्त केले. तर मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अखंड भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो. त्याबद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र बारी यांनी केले तर आभार सीमा नागपुरे यांनी मानले.









