एमआयडीसी पोलीस स्टेशनला वडिलांची फिर्याद
जळगाव ( प्रतिनिधी ) :- सासरच्या त्रासाला कंटाळून तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे प्रतीक्षा चेतन शेळके या विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या ६ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या प्रतीक्षा शेळके या विवाहितेने सुसाईट नोट लिहून १८ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी विवाहितेचे वडील भागवत पांडुरंग धामणे (४८, रा. शिरसोली प्र.न.) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरुन २ लाख रुपये आणावे तसेच विवाहितेचा गर्भपात करण्यासाठी तिचा छळ केला जात होता. यामुळे प्रतीक्षाने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीवरून विवाहितेचा पती चेतन राजेंद्र शेळके, सासरे राजेंद्र नारायण शेळके, सासू वैशाली राजेंद्र शेळके, दीर गौरव राजेंद्र शेळके (सर्व रा. खरजाई, ता. चाळीसगाव), मावस सासरे दिनेश पाटील व मावस सासू छाया दिनेश पाटील (दोघ रा. जारगाव चौफुली, ता. पाचोरा) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अनिल वाघ करीत आहेत.