हरित सेनेतर्फे झाडाला राखी बांधून वृक्षसंवर्धनाची घेतली शपथ
शिरसोली (वार्ताहर) :- येथील बारी समाज माध्यमिक व उच्च .माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधनानिमित्त राखी बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थिनींनी स्वतः राख्या तयार केल्या. विद्यालयातील सुमारे ३०० विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या आकाराच्या व रंगाच्या राख्या स्वतः बनवून आणल्या व त्याचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले.
तसेच राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षाला राखी बांधून अखंड वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली उत्कृष्ट राखी बनविणाऱ्या विद्यार्थिनी प्रथम ,द्वितीय, तृतीय नंबरचे बक्षीस काढण्यात आले. सदरच्या सर्व राख्या विद्यार्थ्यांनी स्वतः बनविल्या व त्या सर्व राख्या सीमारेषेवर तैनात असलेल्या सैनिकांना पाठविण्यात आल्या. सदर उपक्रम सांस्कृतिक प्रमुख चंद्रकांत कुमावत, ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे, मनीषा अस्वार यांनी घडवून आणला. प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, परीक्षक म्हणून सुनील ताडे, व रंजना बारी यांनी काम पाहिले. प्रसंगी दिपाली पाटील, प्रशांत पाठक हे उपस्थित होते.
राष्ट्रीय हरित सेने तर्फे विद्यार्थिनींनी वडाच्या झाडाला राखी बांधून अखंड वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली . प्रसंगी राष्ट्रीय हरित सेना प्रमुख चंद्रकांत कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सदरचा उपक्रम घडवून आणला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे, दीपक कुलकर्णी, भरत बारी, बापूराव कंखरे व विद्यार्थिनी उपस्थित होते.