शिरसाेली ता. जळगाव ;- भविष्यात स्पर्धा परीक्षांतून करीयर करायचं असेल तर वाचन, चिंतन, मननाची क्षमता वाढवा. दृष्टी संशाेधक, चिकित्सक ठेवा. ध्येयनिश्चित करताना घाई करू नका. मात्र, एकदा का ध्येयनिश्चित केले तर ते गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. मनात गाेंधळ वाढला तर तज्ञांची मते जाणून घ्या, असा सल्ला स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक सुनील साेनवणे यांनी येथे दिला.
शिरसाेली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता अाठवी ते बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गशर्दन केंद्र सुरू करण्यात अाले अाहे. त्याचे उद्घाटन बुधवारी करण्यात अाले. या निमित्ताने अायाेजित केलेल्या कार्यक्रमात साेनवणे हे बाेलत हाेते. प्रशासकीय सेवेत ग्रामीण भागातील टक्का वाढावा या उद्देशाने विद्यालयात हे केंद्र सुरु करण्यात अाले अाहे. त्यात स्पर्धा परीक्षा वाचनालय, नियमित वर्ग, वर्तमानपत्र उपलब्ध करून देण्यात येणार अाहेत. पोलिस भरती, रेल्वे, बँक, एमपीएससी, युपीएससी, विविध विभागात होणाऱ्या भरतींची तयारी कशी करावी? या विषयाचे मार्गदर्शन येथे मिळेल. उद्घाटन साेहळ्याला पालक, विद्यार्थी, मुख्याध्यापक पी. पी. कोल्हे, पर्यवेक्षक एस. एस. बारी, आर. के. पाटील, आर. एस. आंबटकर, आकांक्षा निकम, भारती ठाकरे, कोमल काटोले, एस. के. काटोले, सी. एस. कुमावत, डी. जी. कुलकर्णी, एस. ए. भदाणे उपस्थित हाेते.








