शिरसोली ता. जळगाव ;- येथील आरोग्य उपकेंद्रातर्फे गावातील माध्यमिक शाळा आरोग्य मोहिमे अंतर्गत हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालयात दिव्यांग विद्यार्थी रोहित कोळी, प्रतीक्षा नारायण सपकाळे व आकांक्षा कैलास भालेराव या विद्यार्थ्यांनची तपासणी करून समुपदेशन करण्यात आले. बारी समाज विद्यालयात मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन, गैरसमज, अडीअडचणी व मानसिक आरोग्याबाबत डॉ. करुणा भालेराव, डॉ. तेजस्विनी देशमुख, डॉ. देसले यांनी मार्गदर्शन केले. या वेळी परिचारिका नेकेले, सपकाळे, गटप्रवर्तक ठाकरे, स्वयंसेवक नीलेश चौधरी, अनिल पाटील, उपशिक्षक आकांक्षा निकम, मनीषा बारी, मनीषा पायघन, कोमल कटोले, सुरेख वैष्णव, भारती ठाकरे, आशा कोळी, देवका पाटील उपस्थित होते.








