शिरसोली ता. जळगाव (प्रतिनिधी ) ;– शिरसोली प्र. न. ग्रा. पं . च्या सार्वत्रिक निवडणुकीत परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आज गुरुवारी चिंचपुरा येथील दुर्गादेवी मंदिरापासून फुटला असून परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे .
या निवडणुकीत वार्ड क्रमांक १ चे उमेदवार मधुकर प्रल्हाद आंबटकर , व आशाबाई संतोष माळी, वार्ड क्रमांक ४ चे उमेदवार नीलिमा योगेश बारी , ज्योती संजय सूर्यवंशी,निलेश प्रमोद वाणी ,वार्ड क्रमांक ५ चे उमेदवार ज्योतिबाई विलास माळी, अनिता उमाजी पानगळे . शेनफडू नामदेव पाटील वार्ड क्रमांक ६ चे सखुबाई विठाराम पाटील,मंगलाबाई ज्ञानेश्वर(नाना हवालदार ) मराठे, मुदस्सर बशीर पिंजारी असे परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांची नावे असून त्यांनी आपल्या झंझावाती प्रचाराला आज गुरुवारी ७ रोजी सकाळी सुरुवात करण्यात आली . दुर्गादेवी मंदिर, वार्ड क्रमांक ४ मधील विठ्ठल रुख्माई मंदिर,वार्ड क्रमांक २ मधील साईबाबा मंदिर, वार्ड क्रमांक ६ मधील श्रीकृष्ण मंदिर, स्वामी समर्थ केंद्र , भोलेनाथ नगरमधील भोलेनाथ मंदिर ,आदी ठिकाणी उमेदवारांनी जाऊन पूजा केली . यावेळी असंख्य कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यांची होती उपस्थिती
वासुदेव बोरसे, पिरण सदशिव पाटील,मिठाराम पाटील, विलास महाजन, डॉ. बशीर पिंजारी, दस्तगीर मिस्तरी , रऊफ पिंजारी, सईद पिंजारी, आरिफ पिंजारी,प्रशांत वाणी बशीर पिंजारी जेसीबीवाले,उमाजी पानगळे , उमेश पाटील , जगन महाजन, उत्तम आंबटकर,राजु आंबटकर (वेंडर) योगेश बारी,संजू (आबा) सुर्यवंशी, नाना हवलदार,संतोष महजन,श्रीराम महाजन, यांच्यासह तरुण मंडळी आदी उपस्थित होते .
यावेळी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मत इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केले आहे . परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून गावाचे विकासात परिवर्तन करण्याचे ध्येय डोळ्यासमोर असल्याचे उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले.