जळगाव ;- सौ.हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय शिरसोली प्र.बो येथे इयत्ता पाचवी चे बारावीपर्यंत विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी शिबिर आयोजन आज रोजीकरण्यात आले.
वरद पेथॉलॉजी लॅबोरेटरी शिरसोली यांच्यातर्फे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कल्पना प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन प्रमोद जगतराव पाटील हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना प्रमोद पाटील या उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची हे रक्तगट तपासणी करण्यात आली. या शिबिरात जवळजवळ 200 विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली रक्तगट तपासणीसाठी पेश माळी राहुल मराठे, जयेश पाटील, कु.पायल चव्हाण व कु.मयुरी काळे यांनी विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी केली त्यांना शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.