अमळनेर ;-नवाब मलिक यांनी हिरा ग्रुपच्या संदर्भात केलेले आरोप हे वास्तविकतेला सोडून असून रेमडीसीव्हर इंजेक्शनच्या साठा आणि काळाबाजार यासंदर्भात केलेले आरोप हे घृणास्पद असल्याची टीका आज माजी आमदारशिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना दिली .
यावेळी ते म्हणाले कि , आमचे विविध व्यवसाय असून अनेक औषधी कंपन्यांशी सलोख्याचे संबंध आहेत . रेमडीसीव्हर इंजेक्शनसह अन्य औषध आम्ही निर्यात करीत असतो . मागच्या एक ते दीड महिन्यांपासून राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मृत्यूचे तांडव सुरु आहे. मागच्या महिन्यापासून आम्ही ना नफा ना तोटा या नियमानुसार रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. आमच्याकडे रीतसर सहयोगी , भागीदार तसेच काही कंपन्यांवरील परवानाचा साठा उपलब्ध करून दिला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून रेमडीसीव्हर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. बाजारात रेमडीसीव्हर इंजेक्शन काळ्याबाजारात मोठ्या प्रमाणात विकले जात असताना म्हणून काही प्रमाणात असलेल्या इंपोर्टचा साठा रुग्नांपर्यंत पोहचवला तर आम्ही काय गुन्हा केला ? असा सवाल माजी आ. शिरीष चौधरी यांनी उपस्थित केला . एकीकडे विदेशात जाणारे रेमडीसीव्हर इंजेक्शन परकीयांचे प्राण वाचविणार कि भारतीयांचे वाचवणार हे तुम्हीच सांगा. कायद्याच्या चौकटीत असतो तर हजारो लोकांना प्राणास मुकावे लागले असते. जिल्हाधिकारी, मंत्री , विरोधी पक्ष नेते यांना विनंती केली कि , निर्यात होणार साठा भारतीयांचे प्राण वाचवू शकतो म्हणून व्यक्तिगत भेट घेतली. अजूनपर्यंत त्याचा निर्णय झालेला नाही . त्यामुळे सदरचे इंजेक्शन रुग्णांपर्यंत काही प्रमाणात दिली . निर्यात होणारा साठा हा कुठलाही कर न बुडविता रुग्णांपर्यंत पोहचविला असून यामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचले आहेत . त्यासाठी माझ्यावर अनेक गुन्हे दाखल केले तरी मी घाबरणार नाही असे सांगून माजी आ. शिरीष चौधरी यांनी आणखी साठा उपलब्ध झाल्यास जनतेला देईल असे यावेळी त्यांनी सांगितले . गरिबांचे प्राण वाचले याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले .








