शिरसोली ( प्रतिनिधी ) – आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटसवरून वाद उदमवल्या नंतर शिरसोलीत रात्री १०:३० ते ११ वाजेच्या सुमारास समाज कंटकांनी दोन गटात दगडफेक केली. या दगडफैकीत दोन वाहनांच्या काचा फुटल्या . एक तरुण जखमी झाला आहे .एमआयडीसी पोलिस घटनास्थळी धाव घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.सध्या शांतमय वातावरण आहे.
दगडफेक मधील जखमी तरुण
या दगडफेक मध्ये रहीस युसुफ मणियार यांच्या मालकीची एम.एच.19 सी.वाय. 2799 आयशर ट्रक व डॉ. सुफीयान शाहा यांच्या मालकीची एम.एच. 03 ए.आर.1508 फोरव्हिलर सेंट्रोकार यांचे काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर अहमद अखिल पिंजारी वय 18 हा तरुण रस्त्याने मलीक नगर मध्ये जात असताना डोक्याला दगड लागल्याने जखमी झाला आहे.
या वादात आधी आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटस ठेवणा-या तरुणांला मराठी शाळेच्या मोकळ्या मैदानात काही तरुणांनी मारहाण केली यात काही तरुणांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला नंतर अफवा पसरवून मलीकनगर व नसीमन काँलणी मध्ये काही समाज कंटकांनी दगडफेक केली. मात्र शिरसोली गावात हनुमान जंयती निमित्त पोलीस बंदोबस्त असल्याने एमआयडीसी पोलीस लागलीच घटनास्थळी पोहोचले यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
घटनास्थळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे व.त्यांचे सहकारी पोहचले असून परिस्थिती नियंत्रणात आहे .दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास व गुन्हा दाखल करण्याचे काम एमआयडीसी पोलीस करीत आहे.