शिरसोली (प्रतिनिधी) – शिरसोली प्र.न.येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन प्रजासत्ताक दिनी करण्यात आले होते. कृषी उपसंचालक अनिल भोकरे , बीटीएन नरेंद्र पाटील, कृषी सहाय्य्क कमलाकर पवार, कृषी पर्यवेक्षक सुरेश लोहार यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व निर्वाचित उपस्थित होते.
सेंद्रिय शेती,रानभाज्यांचे महत्व , देशी गाईचे महत्व, व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य , सरकारच्या योजना व अनुदान याबद्दल माहिती देण्यात आली. गांडूळ खत , वर्मी वॉश ,’पिकेल ते विकेल ‘ हि संकल्पनाही शेतकर्याना मान्यवरांनी आपल्या मनोगतामधून समजावून सांगितली. शिरसोली प्र.न. येथील सर्व नव निर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा स्वामी समर्थ समर्थ केंद्रामार्फत सत्कार करण्यात आला.व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अर्जुन माळी, राजू आंबटकर , शिवाजी पाटील ,नाना हवालदार , गोपाल बारी आदींनी परिश्रम घेतले.