जळगाव (प्रतिनिधी ) ;- नाशिक विभाग पदवीधर आ. सुधीर तांबे आज 30 जून रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता २०% अनुदान मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलल्या बाबत विनानुदानित कृती समितीतर्फे पदाधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले. त्या सोबतच उर्वरित समस्या आमदार सुधीर तांबे यांच्या समोर प्रा अनिल परदेशी, प्रा पराग पाटील व सहकारी यांनी मांडला. त्यामध्ये शालार्थ आय डी नंबर मिळण्याबाबत, त्याचबरोबर सेवासातत्य मिळण्याबाबत व उर्वरित अघोषित तुकड्यांचे घोषित करण्याविषयी, तृटीत असलेले प्रस्ताव लगेच घोषित करून त्यांचा पगार लवकर सुरू करण्यासाठी शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडावे व प्रचलित नुसार पगार १००% सुरू करावा असा आग्रह संघटनेचे राज्य विभागीय सचिव अनिल परदेशी यांनी आमदार तांबे यांच्याकडे व्यक्त केला. त्यावेळेस आमदार तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना मी रोज कृती समितीचे सर्व समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्व समस्या मी शिक्षण मंत्री यांच्या सोबत चर्चा करून त्या सोडवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करतो असे आश्वासन दिले. याप्रसंगी , प्रा अनिल परदेशी ,प्रा पराग पाटील ,प्रा राजेंद्र साळुंके प्रा ,विजय ठोसर ,प्रा प्रकाश तायडे ,प्रा रवींद्र पवार, प्रा अभिजीत पाटील , प्रा संजय तळेले प्रा गौरव कोळी , प्रा विवेकानंद शिंदे , प्रा ललित पाटील , सौ स्फुर्ती बोरोले , सौ वासंती धाके ,जुक्टो संघटनेचे प्रा शैलेश राणे ,प्रा सुनील गरुड, प्रा सुनील सोनार प्रा अतुल इंगळे हे सर्व उपस्थित होते