जळगाव (प्रतिनिधी ) ;- राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून सुरु असलेल्या एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी या मोहिमे अंतर्गत जळगाव येथील महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसने शिक्षण शुल्कात सरसकट कपात करणे. विद्यार्थ्यांना ज्या सुविधा सद्ध्याच्या वापरता येतं नाहीयेत ते शुल्क आकारु नये, अशा मागणीचे निवेदन आज १० गूरूवार रोजी येथील कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यालयांना दिले.
त्यात सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्दशाचा मान ठेवत आपण शिक्षण शुल्कात सरसकट कपात करावी, त्याच बरोबर विद्यार्थी सुविधा वापरत नाही त्या चे शुल्क आकारु नये, ज्या विद्यार्थ्यांचे मागचे शुल्क बाकी असेल त्या विद्यार्थ्यांना परिक्षेपासुन अथवा शिक्षणेपासुन वंचित ठेवु नये. त्या विद्यार्थ्यांला शाळा व महाविद्यालय सोडण्यास भाग पाडु नये. सदरील निवेदन महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाउपाध्यक्ष गोलु पवार,श्रीकृष्ण माळी, कुणाल धनगर, हितेंद्र पवार ,कृष्णा नाईक, भूषण काटोले, विशाल पाटील आदी उपस्थित होते.