पारोळा ( प्रतिनिधी ) – सासुरवाडीत मारहाण झाल्याची तक्रार पोलिसांनी दाखल करून न घेतल्याने फिर्यादी शिक्षकाला दिलासा देत न्यायालयाने सासुरवाडीतील आरोपींना दोषी ठरवले आहे त्याचवेळी या शिक्षकाच्या पत्नीने न्यायालयात दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा दावादेखील रद्द ठरवला आहे
धुळे तालुक्यातील बाबरे येथील प्राथमिक शिक्षक शंकर भिकन अहिरे यांना पारोळा येथे घरी त्यांची पत्नी संगीता अहिरे, सासरे अशोक भोगे, शालक मनोज भोगे, सासू सौ.मालती भोगे यांनी लोखंडी पाईपने मारहाण व शिवीगाळ केली होती, शंकर अहिरे यांची तक्रार पारोळा पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली होती .म्हणून त्यांनी पारोळा न्यायालयात अँड भुषण माने यांचेमार्फत खासगी दावा दाखल केला होता.
या खटल्यात न्यायालयामार्फत चौकशी होऊन आरोपींना २९ जानेवारीरोजी न्या एम.के.पाटील यांनी भा.द.वि.कलम ३२४, ३२३, ५०६ सह कलम ३४ अन्वये दोषी ठरविले यापूर्वी त्यांची पत्नी संगीता अहिरे हिने पतीविरुध्द पारोळा न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला होता .परंतु न्यायालयाने तो खटलादेखील रद्द केला होता. या दोन्ही खटल्यात फिर्यादीतर्फे अँड भुषण माने यांनी काम पाहिले , त्यांना पराग शिरसमणे यांनी सहकार्य केले.