पोलीस मुख्यालयातील शिबिरात ३० जणांनी केले रक्तदान
पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांची संकल्पना
जळगाव प्रतिनिधी : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून रक्तकेंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यातर्फे शनिवार दि. १३ रोजी पोलीस मुख्यालयात रक्तदान शिबीर पार पडले. या शिबीरात पोलीस दलातील ३० अंमलदारांनी रक्तदान केले. त्यांना राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक (गृह) अरुण आव्हाड, राखीव पोलीस उपनिरीक्षक सचिन चिवंडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे पॅथालॉजी – प्रमुख डॉ. दीपक शेजवळ, रक्त केंद्र प्रमुख डॉ. कविता पाटील, डॉ. कृणाल देवरे, डॉ. श्रृती उमाळे, डॉ. श्रद्धा गायगोळ, तंत्रज्ञ लक्ष्मीकांत त्रिपाठी, दीपक होनमाने, रेहान शेख, प्रदीप पाडवी, प्रफुल्ल कुवर, रोहीत बाविस्कर उपस्थित होते. रक्तदानाकरीता जळगाव विशेष शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष व शहरातील पोलीस ठाण्यांमधील कर्मचारी उपस्थित होते.
त्यापैकी ३० अंमलदारांनी रक्तदान केले. यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार, जयवंत चौधरी, सफौ शामकांत पाटील, संभाजी पाटील, नरेंद्र वारुळे, किरण गायकवाड, रज्जाक सैय्यद, समाधान सिहंले, सुभाष धिरबस्ती, किरण सपकाळे, संदीप पाटील, सचिन पाटील, अरुण पाटील, दीपक चौधरी, गजानन फुसे यांनी परिश्रम घेतले.









