चाळीसगाव;- भगवान महावीर जयंती निमित्त चाळीसगाव जीवन सुरभी ब्लडबँक येथे जैन समाज बांधवांतर्फे दि 25 एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी नगरसेवक व भिमाचा किल्ला जिमखान्याचे अध्यक्ष रोशनभाऊ जाधव यांनी रक्तदान करून जैन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
शिबिरात रक्तदान करण्याकरिता मनोजभाऊ सोलंकी, संदीपभाऊ जैन, प्रमोदभाऊ गुलेच्या, सुशीलभाऊ जैन, प्रीतेशभाऊ कटारिया व बबलूभाऊ जाधव, किरणभाऊ मोरे उपस्थित होते.









