पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील शेतकरी वसंत दौलत शिंपी यांच्या गावानजीक असलेल्या शेतातील आखाड्यातून बैलजोडी चोरीची घटना शनिवारी रात्री घडली. त्यांनी यावर्षी नव्यानेच गुरे बांधण्यासाठी पत्री शेड बनविले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी रात्रीच्या वेळेस अंधाराचा फायदा घेत कुलूप तोडून चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीची बैलजोडी चोरून नेली. वसंत शिंपी यांनी पिंपळगाव पोलिस स्टेशनला बैलजोडी चोरीची फिर्याद दिली. घटनास्थळी लोहारा दूरक्षेत्रचे सहायक फौजदार अरविंद मोरे, पोलिस हेडकॉन्स्टेबल शैलेश चव्हाण व अतुल पवार यांनी भेट देऊन पंचनामा केला.