महाराष्ट्र शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने निवेदन सादर
यावल (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने यावल येथील तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचेकडे आज गुरुवारी दि. १६ रोजी निवेदन देण्यात आले आहे. लवकरच याबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांचा शेतरस्त्यासाठी चाललेला संघर्ष थांबावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने राज्यभर सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभर मोठा शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे. निवेदन देताना तालुका शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे सचिन चौधरी, भगवान पाटील, विजय पाटील, अविनाश पाटील, गणेश पाटील, जितेंद्र पाटील, पंढरीनाथ पाटील, अरुण चौधरी, देवेंद्र जैन, सतीश पाटील यांसह असंख्य शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने जनजागृती जनआंदोलन करण्यात आले. न्यायालयीन लढयाला बळ देणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत तहसिलदारांनी घेतलेल्या परिवर्तनवादी निर्णयाने तालुका सुजलाम सुफलाम होईल. याचा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आदर्श घ्यावा, अशी प्रतिक्रिया शरद पवळे, दादासाहेब जंगले पाटील यांनी व्यक्त केली आहे.