चाळीसगाव येथे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी
चाळीसगाव (प्रतिनिधी) : विजेच्या समस्यांमुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
चाळीसगांव महावितरण कंपनी सर्वसामान्य जनतेकडून करत असलेली सक्तीची वसुली, लोडशेडींगच्या नावाने विज पुरवठा खंडीत करण्याचे प्रकार, विहीर, धरण, नदी, नाले व पाटात पाणी असतांना व पिके तहानलेली असतांना विज वितरण कंपनी नविन कनेक्शन देत नाही, सोलर पंप वेटींगवर आहेत. कमी क्षमतेचे ट्रान्सफार्मर लावण्यात आले असल्याने ते वारंवार जळतात. नविन ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे मागितले जातात. या साऱ्या प्रकाराच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना जो त्रास होत आहे त्या त्रासाच्या संदर्भात विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना जाब विचारण्यात येणार आला. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.